Home धर्म-समाज बेघरांना मिळणार हक्काची घरे- खडसे

बेघरांना मिळणार हक्काची घरे- खडसे

0
38

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमणधारक विस्तापित झाले असून यांना हक्काचा निवारा मिळणार असल्याची माहिती आज माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी दिली.

खासदार रक्षा खडसे यांच्या कार्यवृत्तांत प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भुसावळात येत आहेत. यानिमित्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजनासंदर्भात आज द.शि. विद्यालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बैठक झाली. याप्रसंगी आमदार खडसे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अतिक्रमीत तसेच शहरातील इतर बेघर नागरिकांचा यात समावेश असून साडेचार हजार नागरिकांना मोफत घर दिले जाणार आहे. महाराष्ट्र विकास महामंडळ हौसिंगची बैठकीत आज तत्वत: मान्यता दिली गेली असून उत्तर महाराष्ट्रात प्रथमच भुसावळ मान्यता मिळणार असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, मनोज बियाणी, पंचायत समितीच्या सभापती प्रिती पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैलजा पाटील, तालुका अध्यक्ष सुधाकर जावळे, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound