जळगाव प्रतिनिधी । माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा रूग्णालयात आज अन्नदानासह त्यांना आगळीवेगळी आदरांजली अर्पण करण्यात आली.
डॉ. गुणवंतराव सरोदे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आज जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याच्या अंतर्गत रूग्णासह त्यांच्या आप्तांना भोजन आणि मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले. यासोबत गरजूंना स्टीलचे भांडे तसेच कपडे देण्यात आले. प्रारंभ डॉ. गुणवंतराव सरोदे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर अन्नदान व वस्तू वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवालयाचे प्रमुख दीपक घाणेकर व देसाईजी, डॉ. अतुल सरोदे व सौ. सरोदे तसेच एस.व्ही. पाटील व कुंदाताई पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमातून डॉ. गुणवंतराव सरोदे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.