जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । गोदावरी फोउंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात आज होळी साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी पारंपारिक पद्धतीने पूजा करून होळी पेटविली. या होळी मध्ये लाकूड न वापरता झाडांचा पालापाचोळा जाळण्यात आला.
उपस्थितांना संबोधताना डॉ. प्रशांत वारके म्हणाले की फाल्गुन पौर्णिमेस वसंत ऋतूत येणाऱ्या होळी या सणाचे सांस्कृतिक व ऐतिहासिक असे महत्त्व आहे. सर्वांनी त्यांच्यामधील आळस,अहंकार, ईर्षा, द्वेष, भेदभाव, आदि सर्व दुर्गुणांचे दहन करून सदाचारी जीवन जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी त्यांची नकारात्मकता होळीमध्ये दहन करावी व सकारात्मक विचार ठेवावेत जेणेकरून तुम्ही एक जबाबदार नागरिक बनाल. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक रंग लावून धुलिवंदन साजरी केली.
यावेळी ‘रंगो के संग-रंगताक्षरी’ ही अंताक्षरी सारखी स्पर्धा ऑनलाइन आयोजित केली होती. BBA, BCA आणि MBA च्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता व यामध्ये गाणी म्हटली. कार्यक्रमाचे कामकाज प्रा. भाग्यश्री पाटील यांनी बघितले.
यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफ्रिन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा.चारुशीला चौधरी, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. दिपक दांडगे, मयुर पाटील, गौरव पाटील, सागर चौधरी, गणेश सरोदे, प्रशांत किरंगे, जीवन पाटील, प्रफुल्ल भोळे, रुपेश पाटील, घनश्याम पाटील, रुपेश तायडे, जयश्री चौधरी, भावना ठाकूर इ. कर्मचारी उपस्थित होते.