जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ५ मिनीटांनी शासकीय मुख्य ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी एम.पी.मगर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, जिल्हा उपअधिक्षक संदीप गावीत, परिविक्षाधिन सहाय्यक पोलीस अधिक्षक आप्पासो पवार यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सामाजिक, शैक्षणिक, कृषि, शासकीय सेवेत उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांना ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात आले. या सोहळ्याला जळगाव शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई-वडील, स्थानिक शासकीय / निमशासकीय अधिकारी आणि नागरिकांनी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.