कल्याणमध्ये होर्डींग कोसळले : अनेक वाहनांचे नुकसान

कल्याण-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना ताजी असतानाच आता कल्याणमध्ये देखील होर्डिंग कोसळण्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. याघटनेमुळे नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूकीची कोंडी झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याणमधील सहजानंद चौकात हे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत २ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. होर्डिंग दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र, थेट वाहनांवर कोसळल्याने अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

कल्याण पश्चिममधील सहजानंद चौकात शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास म्हणजे या वेळी या परिसरात मोठी रहदारी असते त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती आहे. होर्डिंग कोसळल्याने वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या होर्डिंगजवळ रुग्णालयासहित अनेक दुकाने समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. वाहनांची पार्किंगही घटनास्थळी होती.

Protected Content