Home Cities जामनेर कोरोना संसर्गामुळे यंदा पहूर येथे पोळा रद्द

कोरोना संसर्गामुळे यंदा पहूर येथे पोळा रद्द

0
28

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहूर येथे सालाबादप्रमाणे साजरा होणारा बैल पोळा सण या वर्षी रद्द करण्यात आला आहे.

उद्या १८ ऑगस्ट रोजी पोळा या सणाच्या निमित्ताने शेतकरी तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, बैल पुजा घरीच करावी, बैलांची मिरवणूक काढू नये. तसेच कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी .तसेच पोळा रद्द करण्यात आले असल्याचे दुर्गा देवी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष विकास अण्णा चौधरी, सचिव अशोक जाधव यांनी सांगितले आहे.

 


Protected Content

Play sound