जळगाव, प्रतिनिधी | जळगाव येथील रहिवासी असलेले सिने-नाट्य कलावंत हितेंद्र उपासनी यांना ‘कलर्स मराठी’ चॅनलवरील लोकप्रिय मालिका ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतील अघोरी साधू ‘देवाप्पा’च्या भूमिकेसाठी ‘सर्वोत्कष्ट नकारात्मक व्यक्तिरेखा’ या प्रकारात ‘कलर्स मराठी’ च्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. येत्या २७ ऑक्टोबर २०१९ रोजी हा पुरस्कार सोहळा ‘कलर्स मराठी’ चॅनलवर दुपारी १२.०० वाजता प्रसारित केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर हितेंद्र उपासनी आपल्या कुटुंबियांच्या भेटीसाठी जळगावात आले असता ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या वतीने जळगाव येथील ज्येष्ठ नाट्य-सिने दिग्दर्शक व कलावंत रमेश भोळे यांनी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत…