भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात हिस्ट्रीसिटरांची ओळख परेड

भुसावळ प्रतिनिधी । शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी गुन्हेगारांवर अंकुश बसविण्यासाठी प्रथम पाऊल उचलले असून आज बाजारपेठ पोलीस स्टेशनला हिस्ट्रीसिटरांची ओळख परेड राबविण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहराची ओळख बाहेर गावी गुन्हेगारांचे शहर म्हणून नाव लैकीक आहे. त्यात मर्डर, दरोडे, बलात्कार, चोऱ्या, घरफोडी, आर्म अँक्ट, खंडणीसारखे गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने या गुन्हेगारांवर अंकुश बसविण्यासाठी आजरोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी शिर्डीला ज्याप्रमाणे गुन्हेगार मुक्त केले. प्रमाणे भुसावळ शहराला सुद्धा गुन्हेगार मुक्त करण्यासाठी गुन्हेगारांचा सर्व डाटा तयार करण्यात आला आहे.यामध्ये साधा दखलपात्र गुन्हा नोंद झाला तरी त्या गुन्हेगारांचा डाटा उपविभागीय पोलीस अधिकारी वाघचौरे यांच्याकडे त्या गुन्ह्याची तत्काळ नोंद करण्यात येणार आहे.

त्या गुन्ह्यादारावर पुन्हा गुन्हा दाखल झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.याप्रकारे एक गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी सिस्टम तयार करण्यात आले आहेत. या पद्धतीने भुसावळ शहराचे काम सुरू झाले असून या अनुषंगाने ४ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान भुसावळ शहरातील हिस्ट्रीसिटरांची ओळख परेड बाजारपेठ पोलीस स्टेशनला राबविण्यात आली. यामध्ये अभिलेखावरील गुन्हेगार बाजारपेठ पोलीस स्टेशनचे ११,शहर पोलीस स्टेशनचे ५ तर तालुका पोलीस स्टेशनचे ३ असे एकूण १९ अभिलेखा वरील गुन्हेगारांची ओळख परेड मा.उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सदर गुन्ह्यातील आरोपी २० ते २५ वयोगटातील आहेत.या अनुषंगाने ही ओळख परेड करण्यात आली.यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, शहर पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content