लंदन-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे भारतात काही उद्योगपती कर्मचा-यांना आठवड्याला ७० ते ९० तास काम करण्याचा सल्ला देतायेत तर दुसरीकडे यूकेमध्ये २०० कंपन्यांनी एकत्रितपणे ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचा-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. द गार्जियन रिपोर्टनुसार, यूनाइटेड किंगडमच्या २०० ब्रिटीश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचा-यांना कुठलीही पगार कपात न करता आठवड्याला ४ दिवस काम करण्याचा नियम लागू केला आहे. या कंपन्यांमध्ये मार्केटिंग, औद्योगिक, चॅरिटी आणि आयटी सेक्टर कंपनीचा सहभाग आहे.



४ डे वर्किंग पॅटर्नचे समर्थन करणा-यांनी सांगितले की, ५ डे वर्किंग पॅटर्न जुन्या आर्थिक युगातून वारसा मिळाला तो बदलण्याची आवश्यकता होती. ९ ते ५ वर्किंग पॅटर्न १०० वर्षापूर्वी बनला होता आणि आता आधुनिक वेळेनुसार तो उपयुक्त नाही. आठवड्याला ४ दिवस काम करणा-या कर्मचा-यांना रिकाम्या वेळेत आणखी चांगला वेळ आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य मिळेल. त्याशिवाय यातून उत्पादन क्षमताही वाढेल. कर्मचा-यांना आकर्षिक करण्याचा हा उत्तम पर्याय आहे असे त्यांनी म्हटले.
हे पाऊल सर्वात आधी मार्केटिंग, जाहिरात, प्रेस रिलेशनशी संबंधित ३० कंपन्यांनी उचललं. त्यानंतर औद्योगिक, आयटी, सॉफ्टवेअर कंपन्यांनी आदेश काढले. आतापर्यंत २०० कंपन्यांनी आठवड्याला ४ दिवस काम करण्याचा नियम लागू केला आहे. ज्यात लंडनच्या ५९ कंपन्या आहेत. कोविड महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होम पॅटर्न आल्याने अनेक कर्मचा-यांना पारंपारिक ढाच्यातून वेगळे केले. जेव्हा अनेक अमेरिकन कंपन्या जसं जेपी मॉर्गन चेस, अॅमेझोनसारख्या कंपन्यांनी कर्मचा-यांना आठवड्याला ५ दिवस ऑफिसला येण्याचे आदेश दिले तर त्याचा विरोध झाला. अनेक कर्मचा-यांनी या आदेशाविरोधात घरून काम करण्याचा अधिकार देण्याची मागणी केली.


