नवी दिल्ली-वृत्तसेवा | केंद्रीय मंत्रीमंडळाच्या रात्री उशीरा झालेल्या बैठकीत महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के इतके आरक्षण देण्याचा ऐतीहासीक निर्णय घेतला आहे.
आज संसदेचे पाच दिवसांसाठी विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. यात काही महत्वाची विधेयके मंजूर करण्यात येतील असे मानले जात होते. जुन्या संसद भवनातील हे अखेरचे अधिवेशन असून उद्यापासून नवीन सेंट्रल व्हिस्टा या इमारतीमध्ये संसद शिफ्ट होणार आहे. आज दिवसभरात विविध पक्षाच्या नेत्यांची भाषणे झाली. यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक सुरू झाली. या बैठकीत रात्री उशीरा महिलांसाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
याआधी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे आरक्षण लागू करण्यात आले आहे. यानंतर आता विधानसभा आणि लोकसभेत देखील महिलांना आरक्षण मिळणार असून देशाच्या इतिहासातील हा महत्वाचा टप्पा मानला जात आहे.