Home राज्य हिंगोलीत गॅसचा स्फोट ; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

हिंगोलीत गॅसचा स्फोट ; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू


320 214 3175003 thumbnail 3x2 hingoli
 

कुरुंदा (वृत्तसंस्था) वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील एका घरात शुक्रवारी मध्यरात्री सिलिंडरचा स्फोटात घरातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

 

 

कुरुंदा येथील सोनाजी आनंदराव दळवी यांच्या यांच्या घरातील सिलिंडरमधून गळती होत असल्याने त्यांनी शेगडी आणि सिलिंडर वेगळे करून ठेवले होते. परंतु मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे उजेड करण्याचा प्रयत्न करताच गळती सुरु असलेल्या सिलिंडरचा अचानकपणे स्फोट झाला. त्यात सोनाजी आनंदराव दळवी (वय 55), पत्नी सुरेखा सोनाजी दळवी (वय 50), मूलगी पूजा सोनाजी दळवी (वय 23) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर, त्यामुळे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound