ब्रेकींग : चिथावणीच्या आरोपातून हिंदुस्थानी भाऊ अटकेत

मुंबई प्रतिनिधी | विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी आंदोलन करण्याची चिथावणी दिल्याच्या आरोपातून हिंदूस्थानी भाऊ नावाने प्रसिध्द असणार्‍या विकास पाठक याला धारावी पोलिसांनी गजाआड केले आहे.

काल राज्यभरात हजारो विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंसक निदर्शनं केली. सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकने या विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे रस्त्यावर उतरले होते. मुंबईतील धारावी भागात हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठया संख्येने रस्त्यावर उतरले आणि पाहतापाहता हिंसक झाले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जदेखील केला. याचप्रमाणे नागपूर, पुणे आदींसह अन्य ठिकाणी देखील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हिंदुस्थानी भाऊने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही व्हिडीओ अपलोड केले होते. यामध्ये त्याने विद्यार्थ्यांना आंदोलनास प्रवृत्त केलं. यानंतर त्याला रात्री उशीरा अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Protected Content