फुलपाट येथे ‘हिंदुराष्ट्र’ फलकाचे अनावरण

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील फुलपाट गावात ‘हिंदुराष्ट्र फुलपाट’ अशा फलकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात ‘हिंदुराष्ट्र’ या ध्येयाचा उद्घोष करण्यात आला. हिंदू जनजागृती समितीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, हिंदू धर्माचे संरक्षण आणि संवर्धन हे आपले कर्तव्य आहे. गावातील जिज्ञासू आणि धर्मप्रेमी युवकांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्यांच्या मते, हिंदू धर्माप्रती निष्ठा आणि राष्ट्रप्रेम या भावना समाजात पुन्हा जागृत करणे आवश्यक आहे.

याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर, विनोद शिंदे, तसेच गावातील माननीय सरपंच जागृतीताई दत्तू पाटील उपसरपंच विमलबाई देवदास भिल
ग्रामपंचायत शिपाई संदीप पाटील, विशाल भोई, समाधान राजपूत, भूषण राजपूत, माधव राजपूत, पवन हटकर, वैभव राजपूत, चेतन राजपूत, सोपान राजपूत, दीपक राजपूत, जितेंद्र राजपूत गावातील अन्य प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. फुलपाट गावातील जिज्ञासू, धर्मप्रेमी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Protected Content