हिंदी भाषा ही भारतातील लोकांना जोडण्याचे काम करते – प्रा. एम.डी. खैरनार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल महाविद्यालयात हिंदी विभागांतर्गत हिंदी साप्ताहिकचे उद्घाटन व काव्यवाचन स्पर्धा प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य  प्रा.ए.पी.पाटील व प्रा.एम.डी.खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा.ए.पी.पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हिंदी भाषेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भाषेचे ज्ञान आवश्यक असते व स्पर्धा परीक्षा मध्ये हिंदी भाषेचा वापर केला जातो. असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.एम.डी.खैरनार यांनी हिंदी भाषेचे महत्व पटवून दिले. हिंदी भाषा ही भारतातील बहुसंख्य लोकांना जोडण्याचे काम करते व आजच्या आधुनिक काळात राष्ट्रभाषा हिंदी ही विश्वभाषा हिंदी झाली आहे. असे मार्गदर्शन केले. महाविद्यालयामध्ये हिंदी काव्यवाचन स्पर्धेत ०६ विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवला.

Protected Content