हिमाचल प्रदेशमध्ये बस दरीत कोसळली ; 12 जण ठार

D5K4ZlaUUAAyb8

 

शिमला (वृत्तसंस्था) हिमाचल प्रदेशमधल्या चंबा जिल्ह्यातील बनिखेतजवळील पंचपुला येथे एक बस खोल दरीत कोसळली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झालाय. त्यात सहा शाळेच्या मुलांसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना हिमाचल प्रदेशमधल्या पठाणकोट-डलहौजी मार्गावर झाली आहे.

 

डॉ. मोनिका यांच्या मते, पठाणकोट-डलहौजी मार्गावर एक खासगी बस शनिवारी बनिखेतच्या खोल दरीत कोसळली. दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. डीएसपी डलहौजी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची एक टीम या घटनेचा तपास करत आहे. तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ बचावकार्य राबवणं आणि पीडितांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

Add Comment

Protected Content