नवी दिल्ली प्रतिनिधी । जुलै महिन्यात सुवर्ण पदकांचा धडका लावलेल्या स्टार धावपटू हिमा दास हिने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवत ‘झेक प्रजासत्ताकमध्ये आज एथलेटिक्स मिटनिक मीटर २०१९ स्पर्धेत बाजी मारली आहे’.
याबाबत माहिती अशी की, २ जुलैपासून एकूण सहावे सुवर्ण पदक जिंकले. दरम्यान, या स्पर्धेत जगातील अव्वल धावपटूंचे सहभाग नव्हते. मात्र, असे असले, तरी हिमाच्या यशाचे महत्त्व मात्र कमी होत नाही. शनिवारी झालेल्या शर्यतीत सुवर्ण जिंकल्यानंतर हिमाने या यशाची माहिती टिष्ट्वटरवरून देताना म्हटले की, ‘झेक प्रजासत्ताकमध्ये आज एथलेटिक्स मिटनिक मीटर २०१९ स्पर्धेत ३०० मीटर शर्यतीत मी अव्वल स्थानी राहिले’.