मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने समीर वानखेडे अथवा त्यांच्या कुटुंबियांबाबत कोणतेही आरोप करण्यास बंदी घातली आहे. या निर्णयामुळे मलीक यांना धक्का बसला आहे.
नवाब मलीक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर सातत्याने आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी एका मागून एक आरोप केले असून याची मोठी चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने आज मलिक यांना मुंबई हायकोर्टाने धक्का दिला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांबाबत वक्तव्य किंवा आरोप करण्यास बंदी घातली आहे.
उच्च न्यायालयाच्याच्या निर्देशानुसार पुढील सुनावणीपर्यंत आठवडाभर फिर्यादी ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध कोणतेही ट्विट किंवा सार्वजनिक वक्तव्यं केली जाणार नाहीत, मग ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रसिद्धी माध्यमातून असोत, असं मुंबई हायकोर्टाने सांगितलं आहे. यावर वानखेडे कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणार नाही, अशी हमी नवाब मलिक यांनी वकिलांच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टाला दिली.