नवी दिल्ली वृत्तसंस्था । पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आपले पाकमधील उच्चायुक्त अजय बिसारिया यांना परत बोलावले आहे.
पुलवामा येथील हल्ल्यानंतर राजनैयिक पातळीवर भारत व पाकमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या हल्ल्यानंतर पाकच्या उच्चायुक्तांकडे भारताने कडक शब्दात निषेध व्यक्त केला होता. यानंतर आता पाकमधील भारतीय उच्चायुक्तांना परत बोलावण्यात आले आहे. भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया हे आज पहाटे भारतात परतल्याचे वृत्त आहे. आज ते विदेश सेवेतील उच्च अधिकारी तसेच वरिष्ठ मंत्र्यांसोबत चर्चा करतील अशी माहिती समोर आली आहे. भारताने पाकशी संबंध तोडण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे.
Sources: Indian High Commissioner to Pakistan Ajay Bisaria arrives in Delhi for consultations with senior officials and leadership. #PulwamaAttack (file pic) pic.twitter.com/kYwujohkGB
— ANI (@ANI) February 16, 2019