रांची-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हेमंत सोरेन झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री बनले. तुरुंगातून सुटल्यानंतर सहाव्या दिवशी त्यांनी पुन्हा एकदा राज्याची सूत्रे हाती घेतली आहेत. ते झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री बनले. यासह ते तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्या आधी त्यांचे वडील शिबू सोरेन आणि भाजप नेते अर्जुन मुंडा यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
हेमंत सोरेन यांची ही शपथही खास मानली जात आहे, कारण 156 दिवसांनंतर त्यांनी 31 जानेवारीला ज्या राजभवनात त्यांना अटक करण्यात आली त्याच राजभवनात पुन्हा शपथ घेतली. हेमंत सोरेन याला आपला विजय आणि भाजपच्या कारस्थानाचा पराभव म्हणत आहेत.