Home Cities जामनेर दिवंगत शिक्षकाच्या वारसांना मदत

दिवंगत शिक्षकाच्या वारसांना मदत

0
46

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । येथील संतोषीमातानगर जि.प.प्राथमिक शाळेचे उपशिक्षक स्वर्गीय नजीर चिंधा तडवी यांना तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांतर्फे त्यांच्या पत्नी श्रीमती सुगराबाई तडवी व मुलगा आशिष तडवी यांना नुकतीच मदत करण्यात आली.

नजीर चिंधा तडवी यांचे अलीकडेच आकस्मीक निधन झाले. यानंतर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची ६० हजार रूपयांची मदत जमा करून त्यांच्या वारसांना दिली. याप्रसंगी वाकडी केंद्राचे केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे व ग.स. सोसायटी चे संचालक अनिल गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. मदत प्रदान करतांना केंद्रप्रमुख संजय पाटील, सुरेश साळी ,रामचंद्र वानखेडे, दिनकर सुरडकर ,सुरेश अंभोरे तसेच सर्व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. याशिवाय पंडीत बावस्कर, संजय वले,राजेंद्र केदारे ,चंद्रकांत सुरवाडे ,अनिल गायकवाड, सुखदेवपाटील ,समाधान बावस्कर,पी.टी.पाटील ,अनिल घाटे ,शंकर भामेरे ,किरण पाटील,भानुदास पाटील ,सुनिल परदेशी, निंबा पाटील ,धनसिंग परदेशी, महेश मोरे ,संजीव सपकाळ , किशोर पाटील , दिनेश गाडे ,नथ्थु माळी ,रमेश चौरे ,हितेंद्र जाधव, भास्कर बुवा , संजय देवरे ,दिलीप हुसे ,बाबुलाल मोरे इत्यादी उपस्थित होते. प्रास्ताविक संतोषी मातानगर शाळेचे मुख्याध्यापक पी. टी. पाटील यांनी तर आभार अनिल गायकवाड यांनी मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound