यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरासह तालुक्याला काल सायंकाळी वादळी वार्यांसह जोरदार पावसाने झोडपले असून यात मोठी आर्थिक हानी झाली आहे.
यावल तालुक्यासह शहर व परिसरात पुनश्च मानसुनपुर्वी आलेल्या बुधवारी सायंकाळी चार वाजेपासून सुमारे दोन तास मोठया वेगाचा वादळी पाऊस झाला. या वादळाने रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडली असुन, केळी पिके संपुर्ण भुईसपाट झाले असल्याची माहीती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर यावल शहरातील हरिओम नगर मधील काही घरांची टीन पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले असून शहरासह ग्रामीण भागात विद्युत पुरवठा मागील सात तासांपासुन खंडित झाला आहे.
या वादळाने किती नुकसान झाले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. तर फैजपूर, रावेर ,चोपडा, धुळे ,दहिगाव, -सावखेडा सिम रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने, एसटी बसेस बंद करण्यात आले असल्याची माहिती यावल एसटीचे आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यानी दिली आहे. यात एकमेव यावल ते भुसावळ कडे जाणार्या बसेस केवळ सुरू असल्याचे त्यांनी सांगीतले. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटलेल्या असून पोल वाकलेले आहेत. संपुर्ण तालुक्यात झालेल्या या वादळी वार्यासह आलेल्या मानसुन पुर्वीच्या पावसामुळे शेतीची देखील मोठी हानी झाली आहे.