धक्कादायक! अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविले

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील जुन्या गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

शहरातील जुन्या गावातील प्रभाग क्रमांक ३ येथील चेतन गजानन कासार (वय १७) या अल्पवयीन मुलाला अज्ञाताने फूस लावून पळविल्याची धक्कादायक घटना २४ मे रोजी सायंकाळीच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास हवालदार विनोद श्रीनाथ हे करीत आहे.

Protected Content