रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात वादळी पावसाने मका भुईसपाट झाला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून अचानक आलेल्या पावसाने सर्वांची दाणादान उडवून दिली आहे.
रावेर परिसरासह खानापूर, अजनाड पाडला पट्यात सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक विजांच्या कडकड्यात वादळी पावसाला सुरुवात झाली. यामुळे खानापूर येथील विकास महाजन यांच्या संपूर्ण मका भुईसपाट झाला आहे. इतरही ठिकाणी नुकसान झाल्याची प्राथमिक माहीती आहे.