२० जुलै रोजी घटनापीठासमोर होणार महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सुनावणी

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । एकनाथ शिंदेंच्या बंडाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. कोर्टाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी करता येणार नसल्याचेही स्पष्ट केल्याने आता महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी बुधवार, दि.२० जुलै रोजी घटनापीठासमोर होणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्या नंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले होते. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेच्या वतीने अपात्रतेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर बुधवार, दि.२० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर याचिकांची सुनावणी होणार असून यावेळी  रमण्णा यांच्याशिवाय न्यायाधीश कृष्णा मुरारी आणि न्यायाधीश हिमा कोहली उपस्थित राहतील.

Protected Content