मराठा आरक्षणावरील सुनावणी आता १५ मार्च रोजी !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून आता यावर १५ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

राज्यातील मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आधी देखील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून यावर आज कामकाज होणे अपेक्षित होते. सुप्रीम कोर्टात आज याबाबत कामकाज झाले. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंची भूमिका ऐकल्यानंतर पुढील सुनावणी १५ मार्च रोजी घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित मुद्दा नसून इतर राज्यांमध्ये देखील ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण गेलं असून त्या राज्यांचा देखील यात समावेश करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्राकडून करण्यात आली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून या प्रकरणात आता इतर राज्यांना देखील नोटिसा पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणी १५ मार्च रोजी सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता आरक्षणाबाबतची सुनावणी पुन्हा एकदा पुढा ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. Hearing On Maratha Reservation On 15 March

Protected Content