जळगाव (प्रतिनिधी) धुळे न्यायालयाने दिलेल्या घरकुल घोटाळ्याच्या निर्णयाविरुद्ध १२ आरोपींनी खंडपीठात जामीन अर्ज केला होता. त्यानुसार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अर्जावर उद्या अर्थात ६ सप्टेंबरला सुनवाई असल्याचे वृत्त समोर आले होते. परंतू देवकर यांच्या जामीन अर्जावर ६ नव्हे तर, ९ सप्टेंबरला सुनवाई असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात अधिक असे की, घरकुल घोटाळ्यात सुनावण्यात अालेल्या शिक्षेविरुद्ध माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार चंद्रकांत सोनवणे, साधना कोगटा, सुभद्राबाई नाईक, अलका लढ्ढा, सदाशिव ढेकळे, मीना वाणी, सुनंदा चांदेकर, डिंगबर पाटील, भगत बालाणी, दत्तू काेळी, कैलास साेनवणे या बारा आरोपींनी मंगळवारी औरंगाबादच्या उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले. यात देवकर यांच्या अर्जावर ६ सप्टेबर तर उर्वरीत सर्वांच्या अर्जावर १६ सप्टेबर रोजी सुनावणी होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. परंतू देवकर यांच्या जामीन अर्जावर ६ नव्हे तर, ९ सप्टेंबरला सुनवाई होणार आहे. दरम्यान, अनेक आरोपींनी दंडाची रक्कम भरली आहे. त्यामुळे जमीन अर्जाच्या वेळी हायकोर्टात याचा विचार होईल,असे बोलले जात आहे. तर खंडपीठाच्या निर्णयावर अनेकांचा कारागृहातील मुक्काम किंवा दिलासा ठरणार आहे.