यावल प्रतिनिधी । तालुक्यात गेल्या दोन दिवसात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढ आहे. या महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनासह आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
महाराष्ट्रसह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाने मोठ्या वेगाने प्रसार केला असुन कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांची प्रतिदिन सातत्याने वाढती संख्याही प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. आज मिळालेल्या कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये यावल तालुक्यातील फैजपुर शहरातुन १३ यावल शहरातुन ४ रुग्ण तसेच पाडळसा, भालोद, कोरपावली, दहीगाव या ठीकाणी मागील २४ तासात एकुण ६९पॉझीटीव्ह रुग्ण आढळुन आल्याने प्रशासना आणि आरोग्य यंत्रणा या दुसऱ्या फेरीतील कोवीड-१९ बरोबर लढा देण्यासाठी सज्ज झाली आहे.
दरम्यान मागील ३ दिवसात वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे एसटी बसेस सह इतर बाजार पेठेवर ही याचा मोठा परिणाम जाणवत आहे. नागरीकांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासन आदेशाची काटेकोर अमंलबजावणी करावी. घरात राहा सुरक्षीत राहा असे आवाहन तहसीलदार महेश पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमन्त बऱ्हाटे, यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला यांनी केले आहे. यावल शहरात एकुण १४ प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आले असुन, तालुक्यातील कोरपावली येथे एक दहिगाव एक, हिंगोणा दोन, पाडळसा एक भालोद एक आणी फैजपुर शहरात एकुण २७ प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे.