चोपडा, प्रतिनिधी | तालुका विट्टल अफ्रो( AFPRO–BCI) प्रा.लि. या आंतर राष्ट्रीय संस्थेच्या नोडल एजन्सीच्या सहकार्याने शालेय विद्यार्थी स्वच्छता जागरूकता अभीयानंतर्गत आरोग्यासाठी वैयक्तीक स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला.
चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील नूतन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी स्वच्छता जागृती अभियांनप्रसंगी संस्थेचे समन्वयक संजय देशमुख व सहकाऱ्यांनी प्रात्याक्षिक घेऊन सर्व विद्यार्थ्यांना आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी विषयी सुचना दिल्यात. तसेच उत्तम आरोग्य जपणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करूण प्रेरीत करण्यात आले. या कार्यक्रम सोबत बाल आरोग्य आणि शेतीतील कामाविषयी विद्यार्थीनी घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास नूतन परिवाराने सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्वाचे आभार व्यक्त करण्यात आले.