भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोळगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्ताने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले . गोदावरी फाउंडेशन जळगाव संचलित डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथील डॉक्टरांचे पथक आरोग्य शिबिरासाठी उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व शिबीरासाठी आलेल्या मान्यवरांचा सत्कार ग्रामस्थांनी केला. त्यानंतर महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली. यावेळी डॉ. किरण जोगावडे , डॉ अंकित भालेराव , डॉ. प्रशांत वानखेडे, डॉ.हिमांशू महाजन, परिचारिका कल्याणी शेहतरे व आम्रपाली मोन, विशाल शेजवळ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आरोग्य तपासणी शिबिरामध्ये एकूण 150 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रुग्णांच्या विविध प्रकारच्या ऑपरेशन साठी 35 रुग्णांना डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे ऑपरेशन साठी रुग्णालयामार्फत घेऊन जाणार आहेत.
याप्रसंगी माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्याम पाटील, सरपंच सौ. कविता अंकुश सोनवणे, ग्रा. पं.सदस्य सौ सुनंदा नाना माळी, उपसरपंच रूपचंद अशोक महाजन, माजी सरपंच सुभाष मोतीराम पाटील, माधवराव चिंतामण पाटील, दगडू दयाराम माळी, कौतिक सोनवणे, अरुण बापू कासार, संदीप हिम्मतराव माळी, शिवाजी सोनवणे , विजय केदार, कपिल महाजन, प्रदीप तुळशीराम महाजन, डॉ. अनुप पाटील, डॉ. वींद्र माळी डॉ. मिस्तरी, महात्मा फुले मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रमोद महाजन , शिवशंकर महाजन , आबा उत्तम महाजन, दादाभाऊ भिला महाजन, बापू गोविंदा पाटील, आमराव भाऊराव पाटील, अशोक शिवराम माळी, भरत रामदास पाटील, जितेंद्र गोसावी, संजय जाधव , पांडुरंग माळी, साहेबराव कोळी, दिनकर पाटील, अर्जुन राजाराम माळी, सुरेश वाघ, शिवाजी पाटील, महात्मा फुले मित्र मंडळ कोळगाव , महाराष्ट्र माळी महासंघ कोळगाव, सरपंच , उपसरपंच , सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वृंद , जिल्हा परिषद मराठी शाळा कोळगाव , यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम पाटील सर यांनी केले. तर आभार शिवशंकर महाजन यांनी व्यक्त केले.