पारोळा प्रतिनिधी । येथील रामलाल काळूराम मिश्र विद्यामंदिरात युवा मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
याकार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसोदे येथील आरोग्य अधिकारी ज्योती परदेशी प्रमुख पाहुणे म्हणून व मार्गदर्शक म्हणून सन्मानित केले गेले. कार्यक्रमात त्यांनी मुलांच्या उत्तम आरोग्य संदर्भात काही टिप्स दिल्या व मुलींच्या समस्यांचे निराकरण केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील जेष्ठ विज्ञान शिक्षक एस. बी. चौधरी यांनी भूषविले.
अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांकडून नवीन तंत्रज्ञान युगात आपण कसे वागावे, कसे राहावे, आपले आरोग्य तंदुरुस्त कसे राहील. त्यासाठी ध्यान, व्यायामातून एकाग्रता कशी मिळेल हे उदाहरणे देऊन स्पष्ट केले. त्यात तोंडावर मास कसा लावावा, कसा वापरावा, त्याची काळजी कशी घ्यावी. हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक स्वरूपात स्पष्ट केले व आरोग्य संदर्भात चर्चा केली. तर आभार प्रदर्शन विद्यालयातील एन. एस. भोई यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.बी. व्ही. सोनार यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक आर. एस. चौधरी व इतर शिक्षक बंधू भगिनी हजर होते तर इयत्ता पाचवी ते आठवी व अकरावी बारावी आर्ट कॉमर्सचे विद्यार्थीनी उपस्थितीत होत्या.