Home Uncategorized बऱ्हाटे शाळेत लॉयन्स क्लबतर्फे आरोग्य तपासणी शिबीर

बऱ्हाटे शाळेत लॉयन्स क्लबतर्फे आरोग्य तपासणी शिबीर

0
52

WhatsApp Image 2019 08 07 at 8.01.28 PM

भुसावळ, प्रतिनिधी | येथील बऱ्हाटे विदयालयातील एकूण ४५९ विदयार्थ्यांची वैद्यकीय तपासणी लॉयन्स क्लबतर्फे करण्यात आली. दि.७ ऑगस्ट रोजी पुंडलिक गणपत बऱ्हाटे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

या शिबिरात लॉयन्स क्लब अध्यक्ष सतीश गोळीवाले, सचिव राजेश.डी.पाटील, कॅबिनेट ऑफीसर गोपाल अग्रवाल, डॉ.नरेंन्द्र भोलाणे, डॉ. एस. एम. महाजन, डॉ. उमाकांत चौधरी, डॉ. भूषण लोखंडे, डॉ. अविनाश पाटील, डॉ. शितल भंगाळे, डॉ. राजेश गुप्ता, डॉ.विलास बेंडाळे, विजय जैन, व्हा.प्रेसीडेंन्ट विनोद सोहळे यांनी विदयार्थ्याची आरोग्य तपासणी केली. यावेळी संस्थाध्यक्ष, परिक्षीत बऱ्हाटे, सचिव, सुभाष बऱ्हाटे, मुख्याध्यापक, सुधीर पाटील , प्राथमिक मुख्याध्यापिका हेमांगिनी चौधरी, प्रशांत चौधरी, अनिल बोरोले, व शिक्षक उपस्थित होते.


Protected Content

Play sound