जळगाव प्रतिनिधी । सर्वत्र कोरोना महामारीचे संकट असतांना मात्र बालसुधारगृहात मुली-महिलांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदशनाचा स्तुत्य उपक्रम रविवारी येथील रोटरी क्लब ऑफ ईस्टच्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आला. या कार्यक्रमात त्वचा व डोळ्यांची तपासणी करण्यात आली. एकूण ३५ महिलांना याचा लाभ झाला.
यावेळी त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अमेय कोतकर यांनी मुली व महिलांचे त्वचेच्या संदर्भातील तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. तर नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. पंकज शाह यांनी डोळ्यांची तपासणी करून या कोरोनाच्या काळात डोळ्यांची निगा कशी राखावी याची माहिती दिली. उपस्थित सर्वांसाठी व कर्मचारिंसाठी मास्क चे वितरण करण्यात आले.
बालसुधारगृहाच्या अधीक्षक जयश्री पाटील, जळगाव जनता बँकेचे उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव, प्रोजेकट चेअरमन मनीषा पाटील, अध्यक्ष भावेश शाह, उपाध्यक्ष वीरेंद्र छाजेड प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी पक्ष्यांकरिता पाणी मिळावे म्हणुन गच्चीवर ठेवण्यासाठी परळ चे वाटप करण्यात आले. यावेळी गरजू मुली व महिलाना औषधी व चष्म्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले. प्रसंगी वैद्यकीय समिती प्रमुख डॉ राहुल भन्साली, स्वप्निल जाखेटे, दीपेन शाह, सचिन जेठवानी, गोविंद वर्मा, संजय गांधी, वर्धमान भंडारी, संजय शाह यानी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पळून हे कार्यक्रम घेण्यात आले.