नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव

 

कोलकाता वृत्तसंस्था । पश्‍चीम बंगालमध्ये दणदणीत विजय संपादन करणार्‍या ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून आपले आधीचे सहकारी शुभेंद्रू अधिकारी यांच्याकडून पराजीत झाल्या आहेत.

 

आज सकाळपासून ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राम या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शुभेंद्रू अधिकारी आधी पुढे होते. तर ममता कधी पुढे होत्या. हा खेळ बराच वेळ चालला. मात्र सायंकाळी भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख मालवीय यांनी ट्विट करून ममता बॅनर्जी या १९५३ मतांनी पराजीत झाल्याची माहिती दिली. यामुळे आता दणदणीत विजय संपादन करणार्‍या ममता बॅनर्जी यांना यामुळे जबर धक्का बसला आहे

 

Protected Content