विद्यार्थींनींसोबत मुख्याध्यापकाचे अश्लिल चाळे; चौकशीचे आदेश

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे करत असल्याबाबची तक्रार स्थानिक शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी शुक्रवार ११ मार्च रोजी शाळेत भेट घेवून पालकांशी संवाद साधून माहिती जाबजबाब घेतला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक हा विद्यार्थीनींना जवळ बोलावून त्यांच्यासोबत अश्लिल चाळे करत असल्याची तक्रार स्थानिक शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्याकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दाखल घेत गटविकास अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी शुक्रवार ११ मार्च रोजी शाळेत जावून येथील विद्यार्थींनी आणि पालकांशी संवाद साधला. यावेळी पालकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. यावेळी पालकांसह विद्यार्थ्यांनींचे जाबजबाब नोंदविण्यात आले. याप्रसंगी पाडळसे केंद्र शाळेचे केंद्र शिक्षक सुनील पाटील उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी शेख यांनी अहवाल गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांचेकडे सादर केला आहे.

 

Protected Content