Home Cities एरंडोल प्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लांबविले

प्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लांबविले

0
28

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव ते एरंडोल दरम्यान बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून ३३ हजार ३०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगिताबाई राकेश पाटील (व-२९) रा. वनकोठा ता. एरंडोल ह्या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १० जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्या भडगाव-एरंडोल बसमधून प्रवास करत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेली ३३ हजार ३०० रूपये किंमतीची सोन्याचे व चांदीचे दागीने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवार १५ जून रोजी त्यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय जाधव करीत आहे.

 


Protected Content

Play sound