भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भातखंडे माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी तथा डी.डी.एस.पी.वरिष्ठ महाविद्यालय एरंडोलचे प्रा.सचिन अशोक पाटील यांनी नुकतीच विद्यावाचस्पती अर्थात पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातील निसर्ग चित्रण लोकसंस्कृती हा शोध प्रबंध सादर करून पीएचडी प्राप्त केली आहे.
यासाठी त्यांना जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.विद्या पाटील या मार्गदर्शक म्हणून लाभल्या होत्या. त्यांना बडोदा येथील डॉक्टर संजय कुमार करंदीकर, मराठी अभ्यास मंडळ अध्यक्ष प्राध्यापक डॉ. आशुतोष पाटील यांच्या हस्ते तसेच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील यांच्या उपस्थितीत ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल एरंडोल, पारोळा, भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. सतीश पाटील, किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील, डी.डी. एस.पी. कॉलेजचे चेअरमन अमित पाटील, प्राचार्य डॉ.ए.आर. पाटील प्राध्यापक व इतर कर्मचारी, भातखंडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.जे. पाटील शिक्षक व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.