भडगावात पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन केल्या सूचना

 

 

 

 

15fd6d43 2740 4928 96d8 17a8fe882282

भडगाव (प्रतिनिधी) मागील आठवड्यात नऊ वर्षीय बालक सय्यद इसम सय्यद बाबू याचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह पाचोरा रोडवरील रजनीताई देशमुख महाविद्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या केळीच्या शेतात टाकलेला आढळला होता. त्या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असतानाच आज त्याचे वडील बब्बु लल्लन सय्यद (वय-४८), आई पिंकी बब्बु सय्यद (वय-३८) बहीण स्नेहा बब्बु सय्यद (वय-१५) यांनी घरात साण्याच्या लोखंडी रॉड ला दोर बांधून सामूहिक आत्महत्या केल्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दुपारी घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपविभागीय अधिकारी नजीर शेख यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. तसेच अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना दिल्या.

 

या बाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी नेहमीप्रमाणे हा परिवार सकाळी ५.०० वाजता उठला व बाबू सय्यद याने सकाळी घराच्या बाजूला मज्जिद मध्ये ५.३० वाजता नमाज पठण केले. यानंतर घरात गेल्यावर दरवाज्याची आतील कडी लावून घेतली, बराच वेळ उलटल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेवून आधी दरवाज्याचा कडी-कोंडा तोडला तेव्हा तिघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेले. जळगाव येथून स्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. या बाबत भडगाव पोलिस स्टेशन
इलियास बेग मुराद बेग मिर्झा रा. टोंणगाव भडगाव यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हि घटना सामुहिक आत्महत्या की घातपात ? याबाबत शहरात उलट-सुलट चर्चा आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

Add Comment

Protected Content