भुसावळ प्रतिनिधी । शहरातील जुना सातारा रोडवरील किराणा दुकान मध्यरात्री फोडून दीड लाखाची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, हेमंत बळीराम सपकाळे (वय-५१) रा. जुना सातारा मरीमाता मंदीराजवळ यांचे ज्ञानदिप सुपर शॉपी नावाने दुकान आहे. ४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता दुकान बंद केले होते. लॉकडाऊनमुळे त्यांनी किरणादुकान बंदच ठेवले होते. १५ एप्रिल रोजी दुकानाच्या उजव्या बाजूचे शटर उचकावून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यातील दीड लाख रूपयांची रोकड लांबविल्याचे समोर आले. हेमंत सपकाळे यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इरफान काझी करीत आहे.