राज्यस्तरीय शुटिंग चॉम्पियनशिप स्पर्धेत हर्षाली पाहुजाने पटकाविले दोन सुवर्णपदक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबई येथे नुकतेच झालेल्या २७व्या कॅप्टन एस.जे. ईजेकल मेमोरियल महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप या राज्यस्तरीय स्पर्धेत जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनच्या हर्षाली राजन पाहुजा हिने दोन सुवर्णपदके पटकावित जळगाव जिल्ह्याचे नाव लौकीक केले आहे.

मुंबई येथे ६ ते १० जून रोजी झालेल्या २७व्या कॅप्टन एस.जे.ईजेकल मेमोरियल महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप या राज्यस्तरीय स्पर्धेत जळगाव जिल्ह्याच्या 12 खेळाडूंच्या संघाने या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होत अतिशय उत्तम कामगिरी करीत अखिल भारतीय निशाणेबाजीच्या स्पर्धेची पात्रता पूर्ण केलेली आहे.

यात हर्षाली पाहुजा हिने १० मीटर एअर रायफल महिलांच्या वरीष्ठ व ज्युनिअर या दोन्ही गटात ४०० पैकी ३९६ असा सर्वोत्कृष्ट स्कोअर करीत प्रथम क्रमांक मिळवित २ सुवर्णपदक पटकाविले आहे. तसेच जामनेर येथील सिमरा आसिफ खान हिने महिलांच्या सब युथ (एम.क्यु.एस.) गटात ४०० पैकी ३७९ गुण मिळवत राज्यात पाचवा क्रमांक पटकाविला आहे. तर वैष्णवी अजय भाटिया हिनेही महिलांच्या युथ व सब युथ गटात ४०० पैकी ३७५ असा उत्तम स्कोअर करीत ७वा क्रमांक मिळवत तीने अखिल भारतीय निशाणेबाजीच्या स्पर्धेची पात्रता पूर्ण केलेली आहे.

पुरुषांच्या वरीष्ठ गटात स्पर्धेत ४०० पैकी अमोल पद्माकर इंगळे यांनी ३६४ तर युथ व सब युथ गटात अथर्व श्रीपाद कासार यांने ३६३ व गगन कमलाकर धांडे याने ३६२ आणि बुलढाणा येथील अमरीश समाधान सिंगणे यांने ३६१ गुण प्राप्त केले आहे. सर्व खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने त्यांची पुढे होणाऱ्या अखिल भारतीय जि.व्हि.मावळंणकर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आणि ऋषिकेश अनिल सपकाळे, रोहित विजय तायडे, सिद्दिकी मो.तलहा मो.शफीक, आबीद अहमद शेख मन्सूर यांनी सुध्दा प्रथमच या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेत चांगली कामगिरी केली आहे.

हर्षाली पाहुजा हिने दोन सुवर्ण पदके पटकाऊन जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबाबत असोसिएशनतर्फे पुष्पगुच्छे देऊन सत्कार करण्यात आला. व अखिल भारतीय निशाणेबाजीच्या स्पर्धेची पात्रता पूर्ण केलेली आहे. त्या सर्व खेळाडूंचे जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनचे अध्यक्ष विषण मिलवाणी, उपाध्यक्ष प्रा.यशवंत सैंदाणे, सचिव व मुख्य प्रशिक्षक दिलीप गवळी, प्रसिद्धी प्रमुख प्रा.विनोद कोचुरे, सहसचिव सुनील पालवे, विलास जुनागडे, किरण पाटील यांनी या खेळाडूंचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content