Home क्राईम गावठी पिस्तूलासह सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या !

गावठी पिस्तूलासह सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या !

0
101


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद गावातील बसस्थानक परिसरात हातात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नशिराबाद पोलिसांनी रविवारी १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गावठी पिस्तूलासह अटक केले आहे. कमलाकर प्रभाकर महाजन (वय ३६, रा. नशिराबाद) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद बस स्टँड परिसरात एक जण गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे सपोनि नारखेडे यांनी पोलीस उपनिरीक्षक हरीष पाटील आणि त्यांच्या पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार, १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नशिराबाद पोलिसांनी सदर ठिकाणी अचानक छापा टाकून संशयित आरोपी कमलाकर महाजन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक लोखंडी, चंदेरी रंगाचा आणि काळ्या रंगाची प्लास्टिकची मूठ असलेला गावठी कट्टा मिळून आला, जो पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरीष पाटील, चंद्रकांत पाटील, गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रविण लोहार आणि समीर सैय्यद या पथकाचा समावेश होता.


Protected Content

Play sound