जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कांचन नगरात माहेर असलेल्या विवाहितेला सासरी निमखेडी येथे कारण नसतांना सासरच्या मंडळींकडून शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील कांचन नगरात माहेर असलेल्या विवाहिता कल्पना उमेश कोळी (वय-२४) यांचा विवाह धरणगाव तालुक्यातील निमखेडी येथील उमेश भरत कोळी यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला काहीही कारण नसतांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्या सासरकडील मंडळींनी देखील शारिरीक व मानसिक छळ केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार विवाहितेला सहन न झाल्याने त्या माहेरी निघून आल्या. त्यानंतर बुधवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पती उमेश भरत कोळी, सासरे भरत फतरू कोळी, सासू लताबाई भरत कोळी सर्व रा. निमखेडी ता. धरणगाव यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय निकम करीत आहे.