अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडले

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव वाक रस्त्यावरून वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडून कारवाई केली आहे. याप्रकरणी बुधवार १२ एप्रिल रोजी ट्रॅक्टर मालकासह चालकावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव ते वाक रस्त्यावरून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती भडगाव महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवारी १२ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर वाळू वाहतूक करतांना पकडले. वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना चौकशीत आढळून आला नाही. महसूल पथकाने ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी १२ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता ट्रॅक्टर मालक शुभम गोकुळ पाटील आणि चालक भागवत मोरे दोन्ही रा. भडगाव याच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हिरालाल पाटील हे करीत आहे.

Protected Content