भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील शिवाजी नगरातील माहेर आलेल्या विवाहितेला सासरी अमरावती येथे दवाखाना टाकण्यासाठी माहेराहून २५ लाख रूपये आणावे अशी मागणी करत शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील शिवाजी नगरातील माहेर आलेल्या नमिता राहूल मेहरा वय ३५ यांचा विवाह अमरावती येथील राहूल मोहन मेहरा यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नानंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून पती राहूल याने त्रास देणे सुरू केले. त्यानंतर दावाखान सुरू करण्यासाठी माहेरहून २५ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाही. या रागातून पतीने विवाहितला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून गेल्या. त्यानंतर त्यांनी बुधवारी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती राहूल मोहन मेहरा याच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत देशमुख हे करीत आहे.