नवीन घर घेण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  हरीविठ्ठल नगरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या विवाहितेला नवीन घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावे यासाठी शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत  बुधवारी २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमध्ये गीता दिनेश सोनवणे (वय-२८) हे आपले पती दिनेश साहेबराव सोनवणे यांच्या वास्तव्याला आहे. त्यांचे २०१४ मध्ये विवाह झाला. लग्नानंतर पती दिनेश सोनवणे यांनी विवाहितेला नवीन घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावे, अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला शिवीगाळ करणे, मारहाण करणे तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सासरे, सासू आणि दीर यांनी देखील त्यांचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. दरम्यान २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता विवाहितेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती दिनेश साहेबराव सोनवणे, सासरे साहेबराव पुंडलिक सोनवणे, सासू प्रतिभा साहेबराव सोनवणे आणि दीर हितेश साहेबराव सोनवणे सर्व रा. हरी विठ्ठल नगर जळगाव यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक सुनील पाटील करीत आहे.

 

Protected Content