Home क्राईम पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामनगर येथील माहेर आणि ममुराबाद येथील सासर आलेल्या विवाहितेला पाच लाखांची मागणी करत शिवीगाळ व मारहाण करत छळ केल्याची तक्रार शनिवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार पतीसह सासरच्या मंडळींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील राम नगर येथील माहेर असलेल्या चेतना आकाश वसाणे वय-२७ यांच्या विवाह जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील आकाश नथ्थू वसाणे यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला  आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर नवीन घर घेण्यासाठी माहेराहून ५ लाखांची मागणी विवाहितेला करण्यात आली. विवाहितेने पैसे आणले नाही या रागातून पती आकाश वसाणे याने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासू, नणंद यांनी देखील पैशांसाठी छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती आकाश नथ्थून वसाणे, सासू कुसुम नथ्थून वसाणे दोन्ही रा. ममुराबाद ता. जळगाव, ननंद कवतिा विनोद चौधरी, लहान ननंद पुनम मनोज सुर्यवंशी रा. शिंदखेडा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर हे करीत आहे.


Protected Content

Play sound