Home क्राईम जुन्या वादातून दाम्पत्यासह मुलाला बेदम मारहाण; ८ जणांविरोधात गुन्हा दाखल

जुन्या वादातून दाम्पत्यासह मुलाला बेदम मारहाण; ८ जणांविरोधात गुन्हा दाखल


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्यासह मुलाला लाकडाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरूवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता घडली आहे. रूग्णालयात उपचार घेतलल्यानंतर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी ३० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ येथे सरिता मनोज कापडणे वय-३१ या महिला आपल्या पती आणि मुलासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. जुन्या भांडणाच्या कारणावरून गुरूवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता शेजारी राहणारे भाईदास जगन कापडणे यांच्याशी वाद झाला. याचा रागातून भाईदास जगन कापडणे, छोटू जगन कापडणे, सिमाबाई, पौर्णिमा, सुनंदाबाई, मिलींद जवाई, जगन खंडू कापडणे, आणि कलाबाई (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. कल्याणे होळ यांनी सरिता कापडणे यांच्यासह त्यांचे पती आणि मुलगा यांना चुलीतील लाकडाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर दाम्पत्याला जळगाव येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर शनिवारी ३० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता सरिता कापडणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणारे आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिपक पाटील हे करीत आहे.


Previous articleअल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
Next articleपाच लाखांसाठी विवाहितेचा छळ
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound