पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मोहाडी येथील माहेर असलेल्या विवाहितेला माहेरहून ५० हजार रूपये आणावे नाहीतर घटस्फोटाची धमकी देवून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी पतीसह आठ जणांविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील मोहाडी येथील माहेर असलेल्या रहिसाबी शब्बीर खाटीक (वय-२५) यांचा विवाह सुरत येथील शब्बीर उमर खाटीक यांच्याशी रितीरिवाजानुसार २०१८ मध्ये विवाह झाला. रहिसाबी ह्या शब्बीर खाटीक यांची दुसरी पत्नी आहेत. त्यांनी पहिल्या पत्नीपासून दोन मुली असून त्या त्यांच्याकडेच राहतात. दरम्यान, दोन्ही मुलींच्या लग्नासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावे अशी मागणी विवाहितेकडे केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. दरम्यान पैसे आणले नाही तर घटस्फोट देईल अशी धमकी दिली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी मोहाडी येथे निघून आल्या. त्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती शब्बीर उमर खाटीक, आलिशानबी हमीद खाटीक, फिरोज हमीद खाटीक, शाहीन फिरोज खाटीक, शिरीन शब्बीर खाटीक, नसरिन शब्बीर खाटीक, मुमजाजबी अमनुर खाटीक, अमनुस यासीन खाटीक सर्व राहणार सुरत गुजरात यांच्याविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद साळी करीत आहे.