दोन लाखांसाठी विवाहितेचा मारहाण करत छळ

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील करमुड येथील माहेर असलेल्या विवाहितेला दुध डेअरी व्यवसायासाठी माहेराहून दोन लाख रूपये आणण्याची मागणी करत सासरी पुणे येथे मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, चाळीसगाव तालुक्यातील करमुड येथील माहेर असलेल्या शितल तुषार निंबाळकर वय २४ यांचा विवाह पुण्यातील तुषार शिवाजी निंबाळकर यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नानंतर काही महिन्यांनी विवाहितेला माहेराहून दूध व्यवसाय करण्यासाठी दोन लाख रूपये आणावे अशी मागणी करण्यात आली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही याचा रागातून पती तुषार निंबाळकर याने विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सासू, दिर यांनी देखील पैशांची मागणी करत शारिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता पती तुषार शिवाजी निंबाळकर, सासरे शिवाजी अशोक निंबाळकर, सासू कांचन शिवाजी निंबाळकर, दिर निलेश शिवाजी निंबाळकर सर्व रा. पुणे यांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अन्वर तडवी हे करीत आहे.

Protected Content