जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाल्मिक नगरातील विवाहितेला घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे अशी मागणी करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील वाल्मिक नगरात नयना मुकेश शिंदे वय २८ या महिला आपले पती मुकेश अभिमन शिंदे यांच्यासोबत वास्तव्याला आहे. दरम्यान घराचे बांधकाम करण्यासाठी माहेराहून ५ लाख रूपये आणावे अशी मागणी पती मुकेश अभिमन शिंदे यांनी केली. दरम्यान विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाही म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेचे पैसे घेवून येशील तर तुला घरात घेईल अशी धमकी देवून शारिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहितेने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून पतीविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मुकेश अभिमन शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोहेकॉ विजय पाटील हे करीत आहे.