जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील माहेर असलेल्या विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत मारहाण व छळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालक्यातील नशिराबाद येथील माहेर असलेल्या सना परवीन रईस शहा (वय-२२) याचा विवाह चाळीसगाव शहरातील रईस शहा कादर शहा यांच्याशी सन २०१७ मध्ये रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे सहा महिने विवाहितेला सासरच्या मंडळींनी चांगली वागवणूक दिली. त्यानंतर तिला लहान किरकोळ कारणावरून टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर कारण नसतांना मारहाण, शिवीगाळ आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्या घराच्या शेजारी विक्रीला असलेला प्लॉट घेण्यासाठी विवाहितेला माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. त्यानंतर सासू, सासरे, नणंद यांनी देखील पैशांचा तगादा लावला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार पती रईस शहा कादर शहा, सासू सायराबी कादर शहा, नणंद शमिनाबी कादर शहा आणि दीर आसिफ शहा कादर शहा सर्व रा. चाळीसगाव यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हरीष पाटील करीत आहे.